Close

Collector Appeal

जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्य शासनाच्या सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वयाचे काम करीत असते . म्हणजेच महसूल प्रशासन हि सर्व प्रशासकीय विभागांची जननी असून शासनाचा कणा आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कटीबध्द असते .नैसर्गिक आपत्ती व टंचाई याची झळ सर्वसामान्य जनतेस बसणार नाही यासाटी आवश्यक त्या उपाययोजना करणे, विविध विकास कामे मार्गी लावणे व शासकीय यंत्राणामध्ये समन्वयघडवून आणणे,जिल्हा निवडणूका जसे लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पडतील याची दक्षता घेणेव नियंत्रण करणे, शासनाचे विविध विभाग व आयुक्त कार्यालायशी समन्वय ठेवून विविध विकास कामांना गती देणे अशा स्वरुपाची कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापित झालेले आहे. 

हि सर्व कामे होत असताना शासकीय कामकाजाच्या बाबतीत अंमलबजावणी होताना काही कमतरता  भासली तर आपण तक्रारी आणाव्यात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील स्तरावर व जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हास्तरावर केले जाते. त्यामध्ये महिलांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी सकाळी १०.०० वा. नोंदवाव्यात. त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे कायद्याच्या चौकटीत राहून निराकरण करण्यात येईल.

सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने कायद्याचे व नियमांचे पालन करावे . प्रत्येकाने कायद्याप्रतीआदर ठेवणे आवश्यक आहे . त्यामुळे चांगला व सभ्य समाज निर्माण होतो. त्यासाटी प्रत्येकाच्या मनात कायद्याविषयी व समाजातील प्रत्येक घटकाविषयी आदरभाव विकाशित होणे गरजेचे आहे