बंद

बीड जिल्ह्याविषयी

बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट  करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट  1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील  अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील
प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो. अधिक माहिती 

बातम्या आणि अद्यतने

तपशील पहा
Collector Beed
श्री. अविनाश पाठक, भा.प्र.से जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी , बीड

मदतकेंद्र क्रमांक

  • नागरिकांचा कॉल सेंटर - 155300
  • बाल हेल्पलाइन - 1098
  • महिला मदत क्रमांक - 1091
  • गुन्हा थांबवणारे - 1090
अधिक...