योजना

योजना श्रेणीनुसार निवडा

शोध

महा योजना

नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महायोजना संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://mahaschemes.maharashtra.gov.in/index.html

प्रकाशन दिनांक: 15/05/2018
तपशील पहा

जलयुक्त शिवार योजना

2019 पर्यंत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त राज्यासाठी महाराष्ट्र सरकारने “जलयुक्त शिवार अभियान” हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये सिमेंट आणि मातीचा स्टॉप डेमचे बांधकाम, नाल्यांवर बांधकाम काम करणे व शेतातील तलाव खोदणे इ. कामे येतात . एमआरएसएसी द्वारा विकसित केलेला मोबाइल ऍपचा वापर या स्थानांना मॅप करण्यासाठी केला जात आहे. मॅप केलेले स्थान या वेब पृष्ठाद्वारे परीक्षण केले जाऊ शकते. वापरकर्ता छायाचित्रांसह अनुप्रयोग, निर्देश सूचना पहा आणि मॅपिंग ठिकाणी पहाण्यास सक्षम…

प्रकाशन दिनांक: 16/05/2018
तपशील पहा

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

http://www.mvstf.org महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यशोगाथा [पीडीएफ, 5 MB] प्रतिष्ठानांबाबत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन हे कंपनी अधिनियमाच्या कलम – ८ नुसार स्थापन करण्यात आली आहे.

प्रकाशन दिनांक: 23/05/2018
तपशील पहा

महालाभार्थी

https://www.mahalabharthi.in/mr अर्ज कसा करावा महालाभार्थी’ पोर्टलची सेवा घेताना नागरिकांना करावी लागणारी प्रक्रिया महाराष्ट्रातील नागरिक स्वत: किंवा संगणक वापरू शकणाऱ्या सुलभकाच्या (Facilitator) मदतीने ‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलची सेवा घेवू शकतात. ‘महालाभार्थी’ सेवांसाठी https://www.mahalabharthi.in ह्या वेब पोर्टलवर नागरिकांनी भेट द्यावी. ‘महालाभार्थी’ ही सुविधा मोबाईल अॅप द्वारे सुद्धा उपलब्ध झालेली आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जाऊन MahaLabharthi असा शोध (search) घेतला असता हे अॅप दिसू लागेल. ते अॅप नागरिक आपल्या अँड्रॉईड…

प्रकाशन दिनांक: 30/10/2018
तपशील पहा