श्री योगेश्वरी माता मंदिर, अंबाजोगाई

श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर  अंबानगरीने साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषणे धारण केली आहेत. मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधिस्थान ही त्यापैकी दोन उल्लेखनीय आहेत. अंबानगरीचे महत्व या कारणामुळे अतोनात वाढले असून प्राचीन काळी ही नागरी इतर नगरांना बुशन भूत ( नगर भूषण भवः ) होऊन बसली होती.योगेश्वरीचे शक्तिपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे.

छायाचित्र दालन

  • योगेश्वरी माता मंदिर.
    श्री योगेश्वरीमाता मंदिर
  • योगेश्वरीमाता मंदिर परिसर
    श्री योगेश्वरी माता मंदिर परिसर

कसे पोहोचाल?:

विमानाने

औरंगाबाद येथिल विमानतळ 230 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परळी आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.

निवास

श्री योगेश्वरी माता मंदिर, अंबाजोगाई या स्थळापासुन शासकीय विश्राम गृह, अंबाजोगाई 1.6 कि.मी. अंतरावर आहे.