बंद

किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज – खरीप 2021

किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज – खरीप 2021

कर्ज मागणी अर्ज

  1. अर्ज भरण्यासाठी कर्जाचा प्रकार, कर्ज खात्याचा प्रकार, अर्जदारांची संख्या निवडून व मोबाईल क्रमांक टाईप करून Submit बटनवर क्लीक करा.
  2. आपल्याला टोकन क्रमांक भेटेल.
  3. अर्जदाराची वैयक्तिक माहिती नांव, जन्म तारीख, लिंग, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, निवासी तालुका, निवासी गाव, पिन कोड, बॅंकेचा बचत खात्याची तपशील टाईप करा. व या पूर्वी आपण वित्तीय संस्थेकडून कोणतेही कर्ज घेतले आहे का निवडून चालू कर्ज खात्यांची संख्या निवडा व NEXT बटनवर क्लीक करा.
  4. अर्जदाराचा चालू कर्ज असेल तर तिची तपशील अर्जदाराची चालू कर्जाची माहिती येथे भरावी.
  5. “अर्जदारांची संख्या” येथे आपण एक पेक्षा जास्त अर्जदार निवडलेले असेल तर मुद्दा क्रमांक ३ व ४ प्रमाणे त्यांची माहिती भरावी.
  6. जमिनीचा तपशील येथे “एकूण किती गटांमध्ये तुमची शेती आहे त्यांची संख्या निवडावी, तालुका, गाव, गट क्रमांक, गटामधील आपल्या शेतीचे क्षेत्रफळ (हेक्टर- आर मध्ये) टाईप करून, सिंचनाचा स्रोत निवडून NEXT बटनवर क्लिक करा.
  7. आवश्यक कर्जाचा तपशील येथे कोणत्या बँकेकडून कर्ज आवश्यक आहे ते निवडा व आवश्यक कर्जाची रक्कम टाईप करा.
  8. प्रस्तावित पिकाचा तपशील येथे प्रस्तावित पिकाची एकुण संख्या निवडून, पिकाचे नाव, प्रस्तावित पिकाखालील क्षेत्र (हेक्टर- आर मध्ये), टाईप करा. व Submit बटनवर क्लीक करा.
  9. आपण भरलेली माहिती आपल्याला दिसेल माहिती बरोबर असेल तर Please Check to Confirm येथे टिक करून Confirm बटनवर क्लीक करा. जर आपण भरलेली माहिती मध्ये काही बदल असेल तर EDIT बटनवर क्लीक करून माहिती दुरुस्त करून Submit करा.

भेट द्या: https://beedkcc.setuonline.com/

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : बीड, महाराष्ट्र | पिन कोड : 431122