• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

कंकालेश्वर मंदिर, बीड

श्रेणी धार्मिक

कंकालेश्वर मंदिर महाराष्ट्रातील बीड शहरामध्ये गोदावरी नदीच्या एका उपनद्याच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर बीडच्या मध्यवर्ती भागाजवळ असून ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कंकालेश्वर मंदिर हे १४व्या शतकात यदव वंशाच्या कालखंडात बांधण्यात आलेले मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले आहे, जी वास्तुशैली यदव काळात विशेष प्रसिद्ध होती. ही शैली मजबूत दगडी रचनेसाठी ओळखली जाते आणि विशेषतः सिमेंट किंवा चुना न वापरता दगडावर दगड बसवून बांधकाम केले जाते.या मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून असेही वाटते की याचे बांधकाम हेमाडपंताच्या आदेशाने किंवा देखरेखीखाली झाले असावे. हेमाडपंत हे देवगिरीच्या यादव राजाच्या दरबारातील एक मंत्री होते आणि त्यांनी राज्यात अनेक मंदिरे आणि तलाव यांची उभारणी केली होती.स्थापनेचा कालखंड अंदाजे १३व्या-१४व्या शतकात (यदव वंशीय काळात)आहे.

छायाचित्र दालन

  • कंकालेश्वर मंदिर
  • kankalewshar temple2

कसे पोहोचाल?:

विमानाने

छ. संभाजीनगर येथील विमानतळ 119 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

बीड पासून जवळ परळी रेल्वे स्टेशन 91 किमी अंतरावर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत .