बंद

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

प्रकाशन दिनांक : 09/03/2021
  • प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)
अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.: कौविउ-२०१५/प्र.क्र.१22/रोस्वरो-१, दिनांक 02 सप्टेंबर 2015
योजनेचा प्रकार : राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रामधील कौशल्य प्रशिक्षण देणे
योजनेचा उद्देश :
  • राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील 11 क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत.
  • १. बांधकाम ( construction )२. उत्पादन व निर्माण (Manufacturing & Production) 3. वस्त्रोद्योग ( Textile) 4. आटोमोटीव ( Automobile) 5. आतिथ्य ( Hospitality ) 6. आरोग्य देखभाल (Healthcare ) 7. बँकिंग , वित्त व विमा (Banking , Finance & Insurance) 8. संघटीत किरकोळ विक्री ( Organized retail) 9. औषधोत्पादन व रसायने (Pharmaceutical & Chemicals) 10. माहिती तंत्रज्ञान व सलग्न (IT and ITes) 11. कृषी प्रक्रिया (Agro Processing)
  • वरील 11 प्राधान्याची क्षेत्रे , तसेच इतर अन्य महत्वाची क्षेत्रे , उदा. कृषी , जेम्स ॲंड ज्वेलरी अश्या अन्य अनेक क्षेत्रांमध्ये राज्यातील उमेदवारांना प्रशिक्षित करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सदरील योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : 15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य धारण करण्याकरीता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) कडे संबंधीत प्रशिक्षण पुरविणाऱ्या सूचीबद्ध असलेल्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी MSSDS च्या संकेत स्थळावर सूचीबद्ध करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांची यादी उपलब्ध आहे. तसेच आवश्यक असलेल्या अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती उपलब्ध आहे.
आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणा करीता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्या संबंधीचे सर्व प्रमाणपत्रे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणा-या प्रशिक्षणावर होणा-या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या संकेतस्थळा वरून , पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणा-या संस्थांच्या यादीमधून, संबंधीत संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे .
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कडे (MSSDS) सूचीबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे अर्ज केल्यावर त्या संस्थेकडून सदर प्रशिक्षण सुरू करण्यात येणा-या पुढील तुकडीत समावेश करण्यात येईल
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 4 मजला, एम.टी.एन.एल. बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mssds.in
  • रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • 1. EPP-1088(359)/EMP-1,Mantralaya,Mumbai-32,Dated 21st March,1995
  • 2. EMP-1074/5678/p-4,Secretariat,Mumbai-32,Dated 14th February,1975
  • 3. EMP-1074/p-4,Mumbai-32,Dated 3rd December.21974
योजनेचा प्रकार : योजनेत्तर
योजनेचा उद्देश :
  • विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गाकरीता
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : नांवनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा रुपये ३००/ ते १०००/ रुपये प्रमाणे होते
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पध्दतीने
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कमीत कमी एक महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maharojgar.gov.in
  • आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण केंद्र.
 
  • रोजगार मेळावे
अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : रोजगार मेळावे
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • १)शासन निर्णय क्र.रोस्वरो२००७/ प्र.क्र.४१/रोस्वरो१ दि.२९/०६/२००७.
  • २)शासन निर्णय क्र.रोस्वरो२००७/ प्र.क्र.४१/रोस्वरो१ दि.१३/०८/२००९.
  • ३)शासन निर्णय क्र.रोस्वरो२००७/ प्र.क्र.४१/रोस्वरो१ दि. ०४/०२/२०११
योजनेचा प्रकार : योजनेत्तर
योजनेचा उद्देश :
  • रोजगार इच्छुक उमेदवार व योग्य मनुष्यबळाची निकड असलेल्या उद्योजकांना एकत्र आणून उद्योजकांना तात्काळ योग्य मनुष्यबळ व बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गाकरीता
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवार व उद्योजक यांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नांव नोंदणी करणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे : नोंदणी कार्ड
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नोकरीची संधी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पध्दतीने
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : दोन ते तीन दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maharojgar.gov.in
  • बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था
अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • १)शासन निर्णय क्र.रोस्वरो२००२/ प्र.क्र.२६७/रोस्वरो१ दि.१७/०८/२००२.
  • २)शासन निर्णय क्र. इएसई२००३/ प्र.क्र.१९१/रोस्वरो१, दि.०१/०२/२००६.
  • ३) शासन निर्णय क्र.कौविउवि२०१५/ प्र.क्र.९७/रोस्वरो१ दि.११/१२/२०१५.
योजनेचा प्रकार : योजनेत्तर
योजनेचा उद्देश :
  • बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटया यांचेमार्फत ग्रामीण तसेच शहरी जनतेला आणि विविध शासकीय विभाग तसेच खाजगी क्षेत्रास विविध दैनंदिन सेवा उपलब्ध करुन देणे व याव्दारे बेरोजगार उमेदवारांना रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गाकरीता
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नांव नोंदणी करणे आवश्यक. कमीत कमी अकरा उमेदवार एकत्रित करुन सहकारी सेवा संस्था स्थापन करणे.
आवश्यक कागदपत्रे : नोंदणी कार्ड
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पध्दतीने
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कमीत कमी एक महिना.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maharojgar.gov.in
  • करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय रोस्वरो२००७/प्र.क्र.३०/रोस्वरो१ दि.३ जानेवारी, २००८
योजनेचा प्रकार : योजनांतर्गत योजना
योजनेचा उद्देश :
  • सध्याच्या जागतिकरणाच्या काळात रोजगाराच्या संधींचे स्वरुप बदलले आहे. रोजगाराच्या नवनवीन संधीबाबत माहिती नसल्याने तथा त्यास अनुरुन पात्रता धारण करीत नसल्याने मोठया संखेने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे माहिती व मार्गदर्शनाभावी रोजगारापासून वंचित राहत आहेत. यामुळे, रोजगारांच्या संधीची माहिती व मार्गदर्शन बेरोजगार उमेदवारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात येणाया बेरोजगार उमेदवारासाठी करिअर ग्रंथालय सष्य अभ्यासिका सुरू करून यामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, मासिके, करिअर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवाराने जिल्हयाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : नोंदणी कार्ड
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • 1) ग्रंथालयामधून विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके, वृत्तपत्रे इ. उपलब्ध करुन दिले जातात.
  • 2) अभ्यासिकेमध्ये नियमित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात येते.
  • 3) रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : ग्रंथालय व अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी संबधित कार्यालय प्रमुखाना विनंती अर्ज देणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज केल्यानंतर अंदाजे १५ दिवसंापर्यंत
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे/ विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे/ आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रे
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सुविधा उपलब्ध नाही
  • महाराष्ट्र राज्यात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे.
योजनेचे नाव : महाराष्ट्र राज्यात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे.
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • शासन निर्णय क्र. रोस्वरो२०१२/प्र.क्र.३०९/रोस्वरो१, दि.१९.०५.२०१४
योजनेचा प्रकार : योजनांतर्गत योजना
योजनेचा उद्देश :
  • उमेदवारांची मुल्यमापन चाचणी करणे व समुपदेशन करुन रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सहाय्य करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी :
  • * जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये वेब पोर्टल येथे नाव नोंदणी केलेले १४ ते ४० वयोगटातील बेरोजगार उमेदवार.
  • * शैक्षणिक पात्रता१० वी/१२ वी, आयटीआय, पदवीधारक, पदवीधारक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित, शिक्षण सोडलेले, कुशल अथवा अकुशल उमेदवार.
  • * नोकरीचा अनुभव असलेले अथवा नसलेले बेरोजगार उमेदवार
आवश्यक कागदपत्रे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संकेतस्थळावर (www.maharojgar.gov.in) नोंदणी.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • * उमेदवार व उद्योजकांची नोंदणी करणे/नोंदणी वाढवणे.
  • * उमेदवारांची मुल्यमापन चाचणी(Assessment Test) वर्तणुक चाचणी(Behavioral Test), मानसशास्त्रीय चाचणी, (Psychological Test) कौशल्यचाचणी(Skill Test) , कल चाचणी (Aptitude Test)घेणे.
  • * वरीलप्रमाणे चाचणीवर आधारीत आवश्यक त्या प्रशिक्षणाबाबत उमेदवारांना मार्गदर्शन/शिफारशी करणे. उमेदवारांना रोजगाराकरीता मार्गदर्शन व समुपदेशन करुन मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देवुन रोजगार उपलब्ध करुन देणे. उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करुन त्याकरीता प्रोत्साहीत करणे व स्वयंरोजगार उपलब्ध होईल या ष्टीने सहाय्य करणे.
अर्ज करण्याची पद्धत : व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रात प्रत्यक्ष भेटी देवुन सेवा उपलब्ध करुन घेणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : त्वरीत.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय पत्ता: ३ रा मजला(विस्तारित), कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई४०० ६१४.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.maharojgar.gov.in
  • केंद्र शासनाची शिकाऊ उमेदवारी योजना
योजनेचे नाव : केंद्र शासनाची शिकाऊ उमेदवारी योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • शिकाऊ उमेदवार आधिनियम 1961
  • शिकाऊ उमेदवार नियम 1992
  • शिकाऊ उमेदवार (सुधारीत ) अधिनियम 2014.
योजनेचा प्रकार : रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना
योजनेचा उद्देश : औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण उमेदवारांना औद्योगिक आस्थापनेत प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी :
  • • शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी उमेदवार विविध व्यवसायासाठी 8 वी, 10 वी, 12 वी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • • उमेदवाराचे वय कमीत कमी 14 वर्ष असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
  • • 8 वी उत्तीर्ण/10 वी उत्तीर्ण/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • • औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • • शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • • आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण
  • • प्रशिक्षण कालावधित दरमहा विद्यावेतन
अर्ज करण्याची पद्धत : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज केल्यानंतर त्वरीत
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक 10036, मुंबई 400 001.
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, अलियावर जंग मार्ग, खेरवाडी, बांद्रे, मुंबई 400 051.
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, घोले रोड, पुणे 411 005
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, त्र्यंबक नाका, जुना आग्रा रोड, नाशिक 422 002
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन्स, नागपूर 440 001.
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती 444 603.
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, भडकल गेटजवळ, औरंगाबाद 431 001.
  • • सर्व जिल्हास्तरीय मूलभूत प्रशिक्षण ततःआ अनुषंगिक सूचना केंद्रे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
  • शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना
योजनेचे नाव : शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची योजना बःआरत सरकारने 1950 साली सुरु केली व 1956 साली राज्य शासनास अंमलबजावणीसाठी हस्तांतरीत करण्यात आली.
योजनेचा प्रकार : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना व कार्यान्वयन
योजनेचा उद्देश : औद्योगिक प्रशिक्षणाद्वारे कारखान्यांना लागणारे कुशल कारागीर तयार करण्यात येतात. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य निर्मिती करण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गांसाठी(इयत्ता 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थी गट)
योजनेच्या प्रमुख अटी :
  • • उमेदवार भारतीय नागरीक असावा.
  • • उमेदवाराचे वयाची 14 वर्ष पूर्ण केलेली असावी.
  • • कोणत्याही व्यवसायाच्या प्रवेशाकरीता कमाल वयोमर्यादेची अट नाही.
  • • उमेदवार महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असावा.
  • • उमेदवाराचे आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास करणारे असावेत.
आवश्यक कागदपत्रे : • शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश पद्धती व नियमावली (माहिती पुस्तिका www.dvet.gov.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत इयत्ता 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष, दोन वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम राबविले जातात, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एन.सी.व्ही.टी. (NCVT) ने निर्देशित केलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते.
अर्ज करण्याची पद्धत : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने असल्याने राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : इयत्ता 10 वी च्या निकालानंतर साधारण जून ते सप्टेंबर पर्यंत विविध टप्प्यामध्ये प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येते. 01 ऑगस्ट पासून प्रथम सत्र सुरु होते.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक 10036, मुंबई 400 001.
  • • सर्व विभागीय सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंग़ाबाद
  • • सर्व प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एकूण 417 औ. प्र. संस्था)
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: