मुखपृष्ठ

 

 

 

रॅन्समवेअर. रॅन्समवेअर म्हणजे काय ?

 

• इंग्रजी शब्द ‘RANSOM’ ‘रॅन्सम’ ह्याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या बदल्यात मागितलेली ‘खंडणी’ beed.nic.in

• इतके वर्ष सायबर गुन्हेगार व्हायरस आणि मालवेअर च्या माध्यमातून केवळ महत्वाचा डाटा/सॉफ़्टवेअर/पासवर्ड माहिती म्हणजे केवळ डिजिटल गोष्टींना नुकसान पोहोचवण्याचे विध्वसंक काम करत परंतू आता या माध्यमातून , पैसे कमवायचा प्रयत्न चालवला आहे.

• इतरांच्या संगणक, नेटवर्क किंवा डाटाचा विध्वंस करण्यात खर्च केलेल्या शक्तीचा मोबदला पैशाच्या स्वरूपात वसूल करण्यासाठी युक्ती म्हणून रॅन्समवेअर तयार झाले.

• सायबर गुन्हेगार अर्थात हॅकर्स अशा प्रकारचे व्हायरस तुमच्या पर्यंत पोचवत आहेत ज्याद्वारे तुमचा डाटा अथवा संगणक तुम्हालाच वापरता येणार नाही अन तो वापरायचा तर त्याबदल्यात मोजावे लागतात पैसे. उदाहरणार्थ एखाद्या सकाळी तुम्ही संगणक चालू करता पण नेहेमी सारखा तो सुरु होण्या ऐवजी एक वेगळीच स्क्रीन दाखवतो अन तुमचा संगणक आता कायमचा लॉक झाला असल्याचं लिहून येतं आणि आता तो तुम्हाला वापरायचा असेल तर तिथे दिलेल्या खात्यावर / लिंकवर जाऊन सांगितले आहेत तेवढे पैसे जमा करा तरच संगणक अनलॉक करता येईल असं लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने तुमचा संगणक तुम्हालाच वापरू न देण्याची अन त्या बदल्यात खंडणी मागण्याची खोड करणारे व्हायरस प्रोग्राम्स म्हणजे रॅन्समवेअर.beed.nic.in

• रॅन्समवेअर बनवणारे केवळ संगणक किंवा मोबाईल लॉक करणंच नव्हे ते तुमच्या संगणक अथवा मोबाईल मधला डाटा इन्क्रिप्ट करतात आणि आता तो परत डिक्रिप्ट करायचा असेल तर त्या करिता पैसे भरावे लागतील अशा सूचना करतात. डाटा इन्क्रिप्ट करणं म्हणजे सामान्य इंग्रजी भाषा बदलून त्याला वेगळ्याच सांकेतिक भाषेत सेव्ह करणे जेणे करून तो डाटा वाचणे कुणालाही शक्य होत नाही अन तो तर परत सामान्य भाषेत आणायचा असेल,ज्याला डिक्रिप्शन म्हणतात,त्या करिता पैसे भरावे लागतील असा खोडसाळपणा हे रॅन्समवेअर करत आहेत.

• हे व्हायरस तुमचा संगणक लॉक करू शकतात अथवा तुमचा डाटा इन्क्रिप्ट करू शकतात त्यामुळे इतर कुठल्याही व्हायरस पेक्षा हे रॅन्समवेअर जास्त हानिकारक ठरू शकतात कारण आपला महत्वाचा डाटा आपल्या ताब्यात असला तरी तो वापरता येत नाही.

• रॅन्समवेअरची सुरुवात झाली १९८९ मध्ये, त्यावेळी फ्लॉपी डिस्क मधून पसरणारा AIDS Trojan पासून. फ्लॉपी डिस्क मधून पसरून, संगणक लॉक होताच त्याबदल्यात Ransom अर्थात खंडणी पोस्टाने पनामा च्या एका पत्त्यावर पाठवावी अशी सुचना करत असे.

रॅन्समवेअर चे प्रकार इन्क्रिप्शन रॅन्समवेअर

 

 

• जे रॅन्समवेअर संगणकातील माहिती इन्क्रिप्ट करून ती आपल्यासाठी निरुपयोगी करतात असे रॅन्समवेअर व्हायरस ह्या प्रकारात मोडतात. असे रॅन्समवेअर संगणकात प्रवेश करताच आपल्या सर्व फाइल्स इन्क्रिप्शन द्वारे लॉक करतात आणि त्यांना अनलॉक करून पुनः वापरण्या करिता खंडणी मागतात. ह्यातील कुप्रसिद्ध रॅन्समवेअरची नावे म्हणजे लॉकी(Locky), क्रिप्टोवॉल(CryptoWall), क्रिप्टोलॉकर(CryptoLocker).


 लॉकर रॅन्समवेअ

:

 

• लॉकर रॅन्समवेअर म्हणजे अर्थातच संगणकाला लॉक करून टाकणारे रॅन्समवेअर. संगणक चालू होताच हे रॅन्समवेअर काम करू लागतात आणि संगणकावरील कुठलीही फाईल अथवा आज्ञावली (Software) तुम्हाला वापरू देत नाहीत. ह्यात हे रॅन्समवेअर कुठलीही फाईल इन्क्रिप्ट करत नाहीत मात्र संगणक लॉक करून त्या वापरूही देत नाही. पोलीस-रॅन्समवेअर (Police-Themed ransomware) आणि विनलॉकर (WinLocker) हे ह्या प्रकारात मोडणारे काही रॅन्समवेअर.

 

रॅन्समवेअर संगणकात कसे येतात ?

 

 

• सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे रॅन्समवेअर पासून सुरक्षित राहायचे कसे? त्या करिता हे व्हायरस येतात कुठून हे जाणून घेणं आवश्यक आहे. रॅन्समवेअर सामान्यतः इतर व्हायरस व मालवेअर संगणकात प्रवेश करतात त्याच पद्धतीने संगणकात शिरकाव करतात.

• इमेल द्वारे आलेले स्पॅम मेल अथवा काही प्रलोभने दाखवणारे अज्ञात स्रोतांहून आलेले मेल मुख्यतः ह्या करिता वापरले जातात. इमेल उघडताच त्या सोबत असलेली जोडणी (Attachments) किंवा चित्रे ह्यांद्वारे हे रॅन्समवेअर आपल्या संगणकात डाउनलोड होतात.

• इंटरनेट वरील रॅन्समवेअर ने प्रादुर्भाव झालेली संकेतस्थळे. (Malicious Websites)

• मोफत वापरता यावीत म्हणून केलेली Cracked Softwares. ह्यात अनेकदा सायबर गुन्हेगार मुद्दाम अशा Cracked Software मध्ये रॅन्समवेअर जोडून ते इंटरनेटवर इतरांना डाउनलोड करिता उपलब्ध करून देतात.

• सोशल मिडिया साईट उदा. फेसबुक आणि लिंक्डइन सारख्या संकेतस्थळांवरून देखील सध्या हे रॅन्समवेअर (विशेषतः लॉकी) वेगाने पसरत आहे.

• मोबाईलला धोका पोचवण्याच्या उद्देशाने तैय्यार केलेले रॅन्समवेअर थेट एसएमएस किंवा व्हाटसअॅशप सारख्या अन्य मेसेजींग अॅ प्लीकेशन द्वारे पसरत आहेत.

 

 

रॅन्समवेअर पासून सुरक्षित कसे राहावे?


 

• आपल्या संगणक अथवा मोबाईल मधील AntiVirus ह्यात फार काही उपयोगाचे ठरत नाहीत. कारण जे तंत्र वापरून रॅन्समवेअर संगणकात काम करतात ते AntiViurs ला शोधून काढणे अवघड जाते म्हणुन रॅन्समवेअरची बाधा आपल्या संगणकाला होऊ न देणे हा एकमेव उपाय सध्या त्यापासून सुरक्षित करू शकतो.


प्रादुर्भाव होऊ नये ह्याकरिता काय कराल ?

 अज्ञात स्रोतांवरून आलेले इमेल उघडू नका आणि त्यातील जोडणी Attachments कितीही आकर्षक वाटली तरी ती डाउनलोड करू नका.
 सोशल मिडिया वरून सध्या वेगाने पसरणारे रॅन्समवेअर आपल्या फेसबुक अथवा लिंक्डइन मधील मेसेज द्वारे अपोआप डाउनलोड होत आहेत. आपल्या मित्र अथवा अज्ञात व्यक्तीच्या नावे एक चित्र (Image) आपल्याला मेसेज द्वारे प्राप्त होऊन ते संगणक अथवा मोबाईल वर आपोआप डाउनलोड होते. ते चित्र उघडताच हा रॅन्समवेअर आपल्या संगणकावर काम सुरु करतो. म्हणून अशा चित्रांपासून लांबच राहिलेले बरे.
 Cracked Softwares आणि Keygens इत्यादी साहित्य वापरण्याअगोदर विचार करा.
 ReDirection अर्थात एक वेबसाईट उघडत असताना अपोआप इतर जाहिरातींनी भरलेल्या अथवा काही आकर्षक साहित्याने भरलेल्या वेबसाईट उघडत असल्यास त्या तत्काळ बंद करून टाका. ह्याकरिता मोफत AdblockPlus सारख्या सोप्या साधनाची मदत तुम्ही घेऊ शकता.
 अज्ञात दुवे (लिंक) सोबत घेऊन येणारे whatsapp आणि एसएमएस द्वारे येणारे मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका तसेच त्यांना पुढे पाठवू नका. सध्या अशा व्हायरस ने भरलेल्या मेसेजेस नी धुमाकूळ घातला आहे.

 

 

 

 

#


खबरदारीच्या उपाययोजना

जगभरातील अनेक संगणक रॅन्समवेअरच्या हल्ल्यापुढे गारद झाले आहेत. दवाखाने, कंपन्या आणि सरकारी कार्यालयांतील संगणकांना या रॅन्समवेअरने लक्ष केले आहे. संगणातील फाईल्सवर कब्जा मिळवून खंडणीची मागणी करणाऱ्या या वानाक्राय या रॅन्सवेअरने नव्या प्रकारच्या सायबर धोक्याची घंटा वाजवली आहे. संगणकाला धोकादायक सॉफ्टवेअर म्हणजे मालावेअर होय. यातीलच नवा उपप्रकार म्हणजे ‘रॅन्समवेअर’ होय. रॅन्समवेअर म्हणजे एक प्रकारची सायबर खंडणीखोरी आहे. ‘रॅन्सवेअर’च्या सहायाने हॅकर्स संगणकातील फाईल्सवर कब्जा मिळवतात आणि संगणक ‘लॉक’ होतो. ऑनलाईन पद्धतीने ठराविक रक्कम भरली तरच तुम्ही संगणकावर काम करू शकतो.

इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या संदर्भात धोक्याची सूचना इशारा लागू केली आहे. या संस्थेने दिलेल्या सुचवलेल्या खबरदारीच्या उपाययोजना पुढील प्रमाणे.
 संगणकाचा नियमित बॅकॲप घ्या. सर्व बॅकअप ऑफलाईन स्टोअर करून ठेवावा.
 अनोळखी इमेल ओपन करू नका. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून जरी इमेल आला आणि तो तुमच्याशी संबंधित नसेल तर ओपन करू नका.
 असंबंधित अटॅचमेंट डाऊनलोड करू नका.
 वेब आणि इमेल फिल्टरचा वापर करा.
 अँटिव्हायरस अपडेटेड ठेवा.
 ऑपरेटिंग सिस्टमशी संबंधित पॅच अपडेट करा
 फायरवॉलचा वापर करा
 युएसबी ड्राईव्ह वापरचे धोरण ठरवा
 व्हीएपीटी टेस्टिंग करून घ्या.
 कोणतीही खंडणी देऊ नका. खंडणीची रक्कम दिल्यानंतरही तुमच्या संगणावरील फाईल्स तुम्हाला मिळतील याची काही शक्यता नाही.
 अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे ... http://www.cert-in.org.in/

Prevention of WannaCry Ransomware Threat - Session by CERT-In

Critical Alert

Wannacry/ WannaCrypt Ransomware

 

 

 

What you need to know about the WannaCry Ransomware

It has been reported that a new ransomware named as "Wannacry" is spreading widely. WannaCry ransomware spreads aggressively across networks, holds files to ransom. Wannacry encrypts the files on infected Windows systems. This ransomware spreads by using a vulnerability in implementations of Server Message Block (SMB) in Windows systems. This exploit is named as ETERNALBLUE.

Best practices to prevent ransomware attacks:
• Maintain updated Antivirus software on all systems

• Check regularly for the integrity of the information stored in the databases.

• Regularly check the contents of backup files of databases for any unauthorized encrypted contents of data records or external elements, (backdoors /malicious scripts.)

• Ensure integrity of the codes /scripts being used in database, authentication and sensitive systems

• Establish a Sender Policy Framework (SPF) for your domain, which is an email validation system designed to prevent spam by detecting email spoofing by which most of the ransomware samples successfully reaches the corporate email boxes.

• Keep the operating system third party applications (MS office, browsers, browser Plugins) up-to-date with the latest patches.

• Application whitelisting/Strict implementation of Software Restriction Policies (SRP) to block binaries running from %APPDATA% and %TEMP% paths. Ransomware sample drops and executes generally from these locations.

• Perform regular backups of all critical information to limit the impact of data or system loss and to help expedite the recovery process. Ideally, this data should be kept on a separate device, and backups should be stored offline.

• Don.t open attachments in unsolicited e-mails, even if they come from people in your contact list, and never click on a URL contained in an unsolicited e-mail, even if the link seems benign. In cases of genuine URLs close out the e-mail and go to the organization.s website directly through browser

• Follow safe practices when browsing the web. Ensure the web browsers are secured enough with appropriate content controls.

• Network segmentation and segregation into security zones - help protect sensitive information and critical services. Separate administrative network from business processes with physical controls and Virtual Local Area Networks.

• Disable ActiveX content in Microsoft Office applications such as Word, Excel, etc.

• Disable remote Desktop Connections, employ least-privileged accounts.

• If not required consider disabling, PowerShell /windows script hosting.

• Restrict users' abilities (permissions) to install and run unwanted software applications.

• Enable personal firewalls on workstations.

• Implement strict External Device (USB drive) usage policy.

• Employ data-at-rest and data-in-transit encryption.

• Consider installing Enhanced Mitigation Experience Toolkit, or similar host-level anti-exploitation tools.

• Block the attachments of file types, exe|pif|tmp|url|vb|vbe|scr|reg|cer|pst|cmd|com|bat|dll|dat|hlp|hta|js|wsf

• Carry out vulnerability Assessment and Penetration Testing (VAPT) and information security audit of critical networks/systems, especially database servers from CERT-IN empaneled auditors. Repeat audits at regular intervals.

• Individuals or organizations are not encouraged to pay the ransom, as this does not guarantee files will be released. Report such instances of fraud to CERT-In and Law Enforcement agencies

Am I protected against this threat?

In order to prevent infection, users and organizations are advised to apply patches to Windows systems as mentioned in Microsoft Security Bulletin MS17-010.CLICK HERE


For any further detail on the same you can visit Indian Computer Emergency Response Team website atCLICK HERE

 

 

 

 

 

Top